वैश्वानर अवतार परम सद्गुरू श्री गजानन महाराज

वैश्वानर अवतार परम सद्गुरू श्री गजानन महाराज पादुका दौरा 
मधुसंचय गणेश मंदिर , ताथवडे उद्यान समोर कर्वेनगर पुणे 
 दि २५ सप्टेंबर २०१२ मंगळवार 

दुपारी ५ ते ६ : श्री गणेश अथर्वशीर्ष हवन 
६.०० ते ६.३० : अग्निहोत्र माहिती व  अग्निहोत्र 
६.३० - ७.३० : कीर्तनकलाशेखर श्री नारायणबुवा काणे यांचे कीर्तन 
७.३० - ८.३० श्री पादुका दर्शन 

श्री काणेबुवा यांनी केलेले अप्रतिम कीर्तन 

१. श्री गणेशाची महती आणि माहिती काणेबुवांनी  सांगितली 

श्री गणेशाची मांडी हे स्थिर चित्त आणि स्थिर बुद्धीचे प्रतिक आहे. त्यामुळे गणेशाचे भक्त असणाऱ्या प्रत्येकाने आपली बुद्धी स्थिर ठेवावी. त्याकरिता ध्यान करावे.श्री गणेशाचे ध्यान अथर्वशीर्षामध्ये सांगितले आहे.

एकदन्तं चातुर्हस्थ पाधामान्कुश्धारीनाम , रदं  च वरदं हस्तेइबिभ्राणम 
-----

असे म्हणून गणेशाचे ध्यान कारावे व बुद्धी स्थिर करावी.

२. गणेशाचे उदर  मोठे आहे कारण त्याच्या उदरात अनंत ब्रह्मांडे आहेत. या सर्व ब्रह्मांडांची सुखे दुखे श्री गणेशाने पटात घेतली आहेत व बाहेतून नागाने ते उदर बांधले आहे.त्याचप्रमाणे मानवाने आपल्या स्वकीयांच्या चुका,  स्वकीयांची पापे यांना क्षमा करून ती पोटात घ्यावीत. त्यामुळे आपसात दुही माजणार नाही.व सार्वजन एकजूट राहतील 

३. श्री गणेशाच्या हातात मोदक नेहमी दिसतो तो त्याच्या हातात कोणी दिला हे आम्हाला माहित नाही. ते धाडस कोणी केले हे आम्हाला माहित नाही.गणपती मोदक खातो असे अथर्वशीर्षात कोठेही लिहिले नाही.
मोदकांचा उल्लेख अथर्वशीर्षात आला आहे तो असा.

यो मोदकसहस्त्रेण यजति  स वांछित फलं वाप्नोती 

जो हजार मोदकांनी  यज्ञात हवन करतो त्याला वांछित फलप्राप्ती होते . याचा अर्थ काय तर अग्निमध्ये जो हवन करतो आणि उरलेले मोदक प्रसाद म्हणून ग्रहण करतो त्याला सर्व प्रकारचा आनंद प्राप्त होतो पण सद्य परिस्थितीमध्ये लोक मोदक तयार करतात नाही जमले तर विकत आणतात. आंणि पैजा मारून ५ - १० -२० मोदक खाऊन संपवतात.आणि ते न पचवता आल्याने शेवटी डॉक्टर चे बिल भारतात.
बुवांनी यातून हेच सांगितले कि मोदक , दुर्वा , गाईचे तूप इ  हवनीय द्रव्यांचे हवन केल्यामुळे मानवास इष्ट फलप्राप्ती होते.
तर जे गणेशभक्त आहेत त्यांनी फलश्रुती मधिल या ओळींचा अभ्यास करावा आणि यजनशील व्हावे.

 ३. श्री गणेशाचा वरदहस्त खालील अर्थ सांगतो.
  1.  हा वरद हस्त वर देण्याकरिता आहे 
  2.   हा वरद हस्त सद्भाक्तास वरती आणण्याकरिता , त्याची प्रगती   करण्याकरिता आहे 
  3.  जे अभक्त , अधर्माचारिणी आहेत त्यांना लवकर वर पाठविण्यासाठी आहे 
  4.  श्री गणेशाचे मागिल दोन हातांमध्ये विविध आयुधे आहेत.ज्यांचा उपयोग श्री गणेशाने दुष्ट प्रवृत्ती आणि असुरांचा नाश करण्याकरिता केला.श्री गणेशा चा वरद हस्त हेच सांगतो हे दुष्ट शक्तीनो , हे अभाक्तानो , लांब थांबा. आपण जर माझ्या भक्ताच्या जवळ आलात तर या शास्त्रांच्या सहाय्याने मी तुमचा संहार करीन.

४. श्री  गणेशाची सोंड म्हणजे त्याचा पाचवा हात आहे.हा हात कायम देण्याकरिता , दान करण्या करिता आहे. आहे. श्री गणेश हा दाता आहे.ताच्याप्रमाणे त्याच्या भाक्तानेहि दानशूर व्हावे अशी श्री गणेशाची इच्छा  आहे.सत्पात्री दान करावे.अक्कलकोट शिवपुरी ला दान म्हणजे सत्पात्री दान आहे. हे सांगताना बुवांनी देवल सर्कस मधील हत्तीची गोष्ट सांगितली. एकदा लहान असताना बुवा सर्कस मधील प्राणी बघायला गेले होते. त्यांच्या काकानि त्यांना एका भल्यामोठ्या हतीच्य पुढे नेऊन उभे केले. हत्ती च्या पुढे एका मोठ्या पराती मध्ये भरपूर सफरचंदे ठेवली होती ती खाण्याकरिता हत्तीने सोंड उचलली . यावेळी बुवांचा थरकाप झाला आता तो हत्ती संपूर्ण परतीसकट ती फळे खातो कि काय असे बुवांना वाटले . पण आश्चर्य घडले त्या हत्तीने एक सफरचंद उचलले आणि पूर्व दिशेला फेकले , एक उचलले आणि पश्चिमेला फेकले ,अश्याप्रकारे चारीही दिशा व उपदिशा यांना त्याने एक एक सफरचंद फेकले. एक माहुताच्या हातावर ठेवले आणि एक बुवांच्या हातावर ठेवले. आणि शेवटी त्याने ते सफरचंदा स्वतः खाल्ले . बुवांना हे पाहून खूप आश्चर्य वाटले व आनंद झाला.अशाप्रमाणे गणेश सर्व ब्रह्मांडाला तृप्त करतो.

५.श्रीगणेशाचे डोळे बारीक आहेत.म्हणजे कोणत्याही गोष्टी चा तो बारकाईने विचार करतो.म्हणजेच तो प्रत्येक कर्म हे अतिशय सावधपणे  करतो. साधा माणूसही एखादि गोष्ट आठवायची असेल तर डोळे बारीक करतो व ती गोष्ट अठवण्याचा प्रयत्न करतो तद्वत लहान डोळे म्हणजे सतत चिंतन करण्याचे लक्षण आहे,

६. श्री गणेशाचे कान हे सुपासारखे लांब आहेत. बुवांनी मोरया गोसावींच्या अभंगाचा उल्लेख करून सांगितले कि , जेव्हा गणेश त्याचे दोन कान हलवतो तेव्हा त्या वार्यामुळे भक्तांची सर्व संकटे दूर होतात.तो दुखहर्ता आहे.

७. श्री गणेशाच्या पायाशी मूषक ( उंदीर ) आहे. उन्दिराला आखुवाहन असे म्हटले आहे. हा उंदीर हे मायाचे प्रतिक आहे, व हि माया श्री गणेशाने आपल्या पायाशी ठेवली आहे.हली च्या काळात हि माया ( पैसा) डोक्यावर ठेऊन लोक फिरत आहे. हि माया मिळवण्याकरिता कोळसा खात आहेत , सिमेंट खात आहेत , जनावरांचा चारा खात आहेत , माती खात आहेत , तोंड वाकडे होईपर्यंत पैसा खात आहेत. हि वृत्ती थांबली पाहिजे.
हि  माया कायम पायापाशी असावी मग ती डोक्यात शिरत नाही असे मत श्री कानेबुवां नि मांडले. निर्मामात्वा वृत्ती अंगी येण्याकरिता दान केले पाहिजे.

या सर्व गोष्टी डोक्यात ठेऊन मगच श्री गणेशाची अनन्य  भावाने पूजा करावी.

एखादा वटवृक्ष बघितल्यावर ज्याप्रमाणे आपण आनंदित होतो त्याची भव्यता , विस्तार , सावली पाहून आपण सुखावून जातो. त्याची स्तुती करू लागतो. पण वटवृक्षाचा जेवढा विस्तार जमिनीच्या वर असतो तेवढाच तो खाली असतो. त्याचे मुल हे तेवढेच जमिनीत खोलवर पसरलेले असते. त्याचप्रमाणे आपण आपल्या पूजनीय देवतेची स्तुती करतो त्याची मूर्ती पाहून आनंदित होतो. पण या सर्वांच्या मुळाशी अग्निदेव आहे.आपण त्याला तृप्त केले कि सर्व देव तृप्त होतात. 


त्यानंतर श्री काणेबुवांनी परम सदगुरुंच्या पैतृक वारसा बाबत माहिती दिली श्री भास्करपंत , तात्याजी महाराज , श्री शिवानंद योगींद्र महाराज ( श्री चे  पिताश्री  ) यांचे वर्णन केले. महाविष्णूंचा दहावा पूर्णावतार कल्की अवतार तो हाच आहे, जगावरील कळक धुवून काढण्यास अखिल विश्वाला हा अग्निहोत्राचा संदेश देणारा हाच वैश्वानर अवतार आहे.


यानंतर ज्यांनी मधुसंचय सोसायटी  चे गणेश मंदिर व सोसायटी  ची जागा ज्यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली ते श्री नामजोशी ,व श्री  वाघ  यांचे आभार प्रदर्शन झाले .

No comments:

Post a Comment