Wednesday, December 15, 2010

महासोमयाग



 वेदः यज्ञेन  अभि: प्रवृता: ||

 एक आवाहन !!
   
यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन I
तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाःII





 यज्ञ हाच देवांचा मूळ धर्म होता.त्यामुळे यज्ञात दिलेली आहुती हि सर्वश्रेष्ठ कर्म आहे.
पण सर्वाना माहित असेल कि सृष्टीच्या प्रारंभी वेद सांगितले गेले. हे वेद कोणीही लिहिलेले नाहीत ते अपौरुषेय आहेत. वेदांनि अग्नीचेच सहस्त्र मुखांनी गुणगान गायले आहेत. त्यामुळे अग्निउपासना हि अतिप्राचीन काळापासून चालू आहे.


भूमंडळी लहान थोर सकळांसी वन्हीचा आधार I अग्नीमुखे परमेश्वर संतुष्ट होय II
ऐसा अग्नीचा महिमा I बोलुले तितुकी उणी उपमा I उत्तरोत्तर अगाध महिमा अग्निपुरुषांचा II


या शब्दात समर्थ रामदासांनी अग्नीची थोरवी गायिली आहे. सर्व धर्मग्रंथामध्ये अग्निउपासानेचा उल्लेख आढळतो.प्रभू श्रीराम व भगवान परशुराम यांनी अश्वमेध , पांडवानी राजसूय असे महायज्ञ करून अग्निनारायनाची महती जगासमोर सादर केली. प्राचीन कालापासून यज्ञाद्वारे मनुष्याने देवाना संतुष्ट केले.


यज्ञाद्वारे वायुमंडळ शुद्धी होते. निसर्गाचा समतोल साधला गेल्यामुळे वेळेवर पाऊस पडतो व सर्वत्र सुबत्ता होते.सध्या जगात वाढलेल्या प्रदूषणावर अग्निहोत्र यज्ञ हा एकमेव उपाय आहे. हवा शुद्ध झाल्यामुळे आपोआपच मनाची शुद्धी होते व प्रगती होते. आजच्या सर्व समस्यांना यज्ञ हे प्राचीन काळीच दिलेले चोख उत्तर आहे. अध्यात्मिक व वैज्ञानिक दोनीही पातळीवर यज्ञाचे महत्व सिद्ध झाले आहे.


अशाच प्रकारच्या महासोमयागाचे आयोजन वेद विज्ञान अनुसंधान संस्था , शिवपुरी अक्कलकोट यांनी केले आहे.


पश्चिम बंगाल मधील खडगपूर ( ४ ते ९ जानेवारी २०११ ) आणि मुंबई मध्ये कुर्ला येथे (१३ ते १८ मे २०११ ) महासोमयाग संपन्न होणार आहे. तपशील खालीलप्रमाणे :-


सर्वज्योतीरअग्निष्टोम महासोमयाग


खडगपूर ( ४ ते ९ जानेवारी २०११ )
पत्ता :-
नं ३ म काली ग्राउंड
खडगपूर, मिदनापूर , पश्चिम बंगाल , 72130


त्रिरात्र साम्मिताग्निष्टोम महासोमयाग
पत्ता:-
कुर्ला , सविस्तर पत्ता कळविण्यात येईल


 ऋग्वेद , अथर्ववेद, सामवेद , यजुर्वेद या वेदातील पारंगत असे श्रोत्री या यज्ञाचे संचालन करतील. हैदराबादचे विद्वान श्रीनिवास सत्री याचे अध्वर्यू पद भूषवतील.गोव्याचे श्री दीपक आपटे यज्ञाचे यजमान आहेत.



 त्यावेळी विविध प्रकारच्या स्मार्त यज्ञाचे (गणेश याग , मृत्युंजय हवन ) आयोजन केले आहे ज्यामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊ शकता. सर्व जाती धर्माचे लोक यात सहभागी होऊ शकतात.

खालील प्रमाणे आपल्याला  सहभागी होता येइल .
१. यज्ञस्थानी उपस्थित राहून सेवा करणे.
२. यज्ञासाठी आवश्यक द्रव्य देणगी स्वरुपात देणे.


आपली ऐच्छिक देणगी हि रोख अथवा धनादेशाच्या स्वरुपात द्यावी. आपणा रीतसर पावती देण्यात येईल.
कृपया सढळ हाताने या धर्म कार्यास मदत करावी हि विनंती.


जय भार्गवराम !! जय गुरुदेव !!







मनोहर सुभाष जोशी
Heal the Atmosphere,
Perform AGNIHOTRA.
visit :
www.agnihotraindia.com
http://www.shivpuri.org/


No comments:

Post a Comment